आखाती देशात आंबा निर्यातीला सुरुवात
या आठवड्यापासून आखाती देशात आंबा निर्यातीला सुरुवात झाली. हापूसचा गोडवा सातासमुद्रापार दरवळू लागला आहे. सध्या कोकणातून सुमारे ६ हजार पेटी आंबा वाशी बाजार समितीत रवाना होत आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे दोन ते अडीच हजार पेटीचा समावेश आहे.फेब्रुवारी- मार्चपासून हापूस आंब्याच्या हंगामाची प्रतीक्षा सर्व व्यापार्यांसह आंबा खवय्यांनाही असते. यंदे १० फेब्रुवारीपासून आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार सुरूवातीला ५०० ते १००० पेट्यांची आवक होती. सध्या कोकणातून हापूस आंब्याच्या सहा हजार पेट्यांची आवक बाजारात दररोज होत आहे. ही आवक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार आखाती देशातही आंबा निर्यात सुरू करण्यात आली आहे. दर दोन ते तीन दिवसांत हापूस आंबा आखाती देशासाठी रवाना होत आहेतwww.konkantoday.com