
सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर दुसर्या दिवशीही वाहतूक कोंडी
मुंबई-गोवा महामार्ग दुसर्या दिवशीही वाहतूक कोंडीत अडकला. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे महामार्गावर सोमवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे प्रविास करताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे रणगणत्या उन्हात प्रवाशांना घाम फुटला. उन्हाळी सुट्टीच्या हंगामामुळे चाकरमान्यांसह पर्यटक कोकणात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. मात्र महामार्गावर ठिकठिकाणी होणार्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडी फोडताना त्या त्या ठिकाणी तैनात वाहतूक पोलिसांची दमखाक होत आहे. सोमवारीही महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांसह पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे महामार्गावरून धावणार्या वाहनांचा वेग काही अंशी मंदावला. www.konkantoday.com