राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा व प्रदेश सरचिटणीस चित्रा चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप पक्ष हा परिवार आहे. या परिवारात प्रत्येकाचा सन्मान केला जातो.हा शब्द भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा चव्हाण यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांना आपण दिला आहे. तुम्ही सर्व भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून आला आहात. तुम्हा सर्व महिलांना सन्मान देऊ, असा विश्वास भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी चिपळूणमध्ये नारी शक्ती वंदन मेळाव्यात व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला आघाडी जिल्हाध्यक्षा व प्रदेश सरचिटणीस चित्रा चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा व रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संयोजिकापदी निवडीची घोषणा केली. हा कार्यक्रम चितळे मंगल कार्यालयात झाला. प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचे चिपळूणमध्ये आगमन होताच उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा व माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसमवेत जोरदार स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी माजी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, काँग्रेसच्या श्रद्धा कदम, राधिका लवेकर, रसिका काजारी आदी महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button