
हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे ६ बंडखोर आमदार अपात्र
राज्यसभा निवडणुकीवेळी क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांवर पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत कारवाई ओढावून घेतली आहे, असे स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिग पठानिया यांनी आज ( दि.२९ फेंब्रुवारी) ६ बंडखाेर आमदारांना अपात्र ठरवले आहे. काँग्रेस आमदार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत बंडखाेर सहा आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या सहा आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे हिमाचल प्रदेशच्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला होता.lविधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी बुधवारी ( दि.२८ फेब्रुवारी) दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. व्हीप जारी असतानाही भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करणे. याशिवाय अर्थसंकल्प मंजूर करताना सभागृहात अनुपस्थित राहिल्याचे आरोप काँग्रेस आमदार राजेंद्र राणा, सुधीर शर्मा, रवी ठाकूर, देवेंद्र कुमार भुट्टो, इंद्रदत्त लखनपाल आणि चैतन्य शर्मा यांच्यावर होता. विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिग पठानिया यांनी आज ( दि. २९ फेंब्रुवारी) या बंडखाेर आमदारांना पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र करण्यात आलेराज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसल्यानंतर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडी वेगावल्या. काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आमदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांचे वडील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवंगत वीरभद्र सिंह यांचा अनादर केल्याचा आरोप करत राज्यमंत्री विक्रमादित्य सिंह आज सकाळी मंत्रीपदावरून पायउतार झाले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह १५ आमदारांना निलंबित केले. दिवसभरातील वेगवान राजकीय घडामोडीनंतर बुधवारी रात्री विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा मागे घेतला. यानंतर हिमाचल प्रदेशमधील राजकीय नाट्यावर पडदा पडलाwww.konkantoday.com



