सोंडेघर धरणातील पाणी पुरवठा करणारे कर्मचारी ९ महिने पगाराविना
दापोली तालुक्यातील पालगडला सोंडेघर धरणातील पाणी पुरवठा करणार्या कर्मचार्यांना ९ महिने पगार मिळालेला नाही. यामुळे ग्रामस्थांची तहान भागविणार्या कर्मचार्यांवर पगाराविना उपासमारीची वेळ आली. अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे.वडवळी, पाचवली, माटवण, सोंडेघर आणि पालगड या पाच ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्याचा ठेका पालगड ग्रामपंचायतीने घेतला आहे. या गावांच्या ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचार्यांचा पगार ९ महिने उलटून गेले तरी ग्रामपंचायत खात्यात जमा झालेला नाही.www.konkantoday.com