रत्नागिरी जिल्ह्यातील ७० हजार बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात ३ मार्च रोजी पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील ० ते ५ वर्ष वयोगटातील ७० हजार १४७ बालकांना या मोहिमेद्वारे लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण १०० टक्के यशस्वी करण्यासाठी ३५२ सुपरवायझर, १३६५ आयपीपीआय टीम तैनात करण्यात येणार आहेत.या मोहिमेसंदर्भात टास्क फोर्स बैठक जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. ए. आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण श्रीकांत हावळे उपस्थित होते. या मोहिमेंतर्गत एकही बालक वंचित राहू नये, यासाठी पोलीओ लसीरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी लसीकरण मोहिमेसंदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती दिली. २ मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या. www.konkantoday.com