महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी दि. ५ मार्चपासून घेतला बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी दि. ५ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा आपला निर्णय कायम ठेवला आहे. कामगार उपायुक्त संतोष भोसले यांच्या उपस्थितीत कामगार भवन बांद्रा येथील बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.कामगार उपायुक्त संतोष भोसले, महावितरण ललित गायकवाड, महापारेषणचे भरत पाटील, महानिर्मितीचे श्री. वाजुरकर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. वीज उद्योगातील सर्व कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहीत रोजगार दिल्यास प्रशासकीय खर्चात दरवर्षी सुमारे २ अब्ज ३२ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत पडू शकतात. असा दावा संघटनेने केला आहे. पगारवाढ करावी, वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत रोजगार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.www.konkantoday.com