
निवृत्तीवेतनधारकांची विभागीय सहविचार सभा येत्या शनिवारी श्रीराम मंदिरात होणार
रत्नागिरी (प्रतिनिधी) : सेवानिवृत्तांची जनसेवा समिती, जिल्हा रत्नागिरी, या संघटनेची विभागीय सहविचार सभा येत्या शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी रत्नागिरी येथील श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या सहकार्याने आयोजित या सभेत निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक आणि संघटनात्मक प्रश्न समजावून घेऊन त्यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. केंद्रीय आणि राज्यातील निवृत्ती वेतनधारकांना मिळणाऱ्या सोयी सवलतीमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या सोडविण्यासाठी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन “सेजस”च्या अध्यक्षांनी केले आहे. सत्तर वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्तांचे यावेळी सत्कार करण्यात येणार आहेत.www.konkantoday.com