
धुमसणार्या कचर्यामुळे नागरिक हैराण
खेड-समर्थनगरच्या रहिवाशांकडून नगर प्रशासन धारेवरखेड शहरातून जमा होणार्या कचर्याची समर्थनगर येथे विल्हेवाट लावली जात आहे. धुमसणार्या कचर्यामुळे रहिवासी मेटाकुटीस आले आहेत. याशिवाय रात्रीच्या सुमारास कचरा डेपोत आगडोंब उसळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मात्र तरीदेखील नगर प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने संतप्त रहिवाशांनी कचरा डेपोत जावून नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांना धारेवर धरले.शहरातील कचरा प्रकल्पाचे घोंगडे भिजतच पडल्याने कचर्याची विल्हेवाट लावायची कुठे, असा प्रश्न दस्तुरखुद नगर प्रशासनालाच सतावत आहे. कचराप्रकल्पासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने दिवसेंदिवस कचरा प्रकल्प जटील बनत चालला आहे. गेल्या अनेक वर्षापासून समर्थनगर येथेच कचरा डेपो बनवण्यात आला आहे. www.konkantoday.com