
दुसर्याने आणलेल्या विकासकामांचे भूमिपूजन करण्याचे खासदार राऊत यांची नेहमीची सवय -उल्का विश्वासराव यांची टीका
दुसर्यांनी आणलेल्या विकास कामांचे आपण भूमिपूजन करायचे ही शिवसेना (उबाठा) गटाच्या स्थानिक आमदार व खासदारांची जुनीच खोड आहे. पण हे प्रकार आता बंद करा आणि त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही करू नका, कारण तुमचा खोटेपणा जनता ओळखून आहे. अशा शब्दात भाजपा नेत्या तथा राजापूर-लांजा विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे स्थानिक आमदार खासदार यांना इशारा दिला आहे.www.konkantoday.com