
१ हजार ४८६ महिलांना मिळाली रेशन दुकानावर साडी, रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार ७३० कुटुंबांना मिळणार साड्या
जिल्ह्यातील मंडणगड व दापोली तालुक्यात अंत्योदय कुटुंबातील महिलांना पुरवठा विभागाकडून १०० टक्के साडी वाटप पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात सध्या या योजनेतून ७३.१५ टक्के पूर्ण झाले आहे. राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार ७३० कुटुंबांना मिळणार आहे. लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये आता साडी वितरण सुरू होणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.राज्य सरकारने राज्याचे एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर केले आहे. या धोरणानुसार वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली एक साडी अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबाला मोफत वाटप करण्यात येणार आहे.www.konkantoday.com