*१८ वर्षात तब्बल ४६ वेळा रक्तदान करणाऱ्या रत्नागिरीतील विकास साखळकर यांचा सीबीएस संस्थेकडून गौरव
एक सर्वसामान्य चालक म्हणून काम करणारे आणि रक्तदान करणे हाच एक छंद मानून गेल्या १८ वर्षात तब्बल ४६ वेळा रक्तदान करणाऱ्या रत्नागिरीतील विकास साखळकर यांना सीबीएस संस्थेकडून राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार, त्यांची मुलगी स्वरा साखळकर हिला राज्यस्तरीय युथ आयडॉल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम सांगोला (जि. सोलापूर) येथे ज्येष्ठ कवी अनंत राऊत, चांद भैय्या शेख यांच्या उपस्थितीत झाला.साखळकर यांनी क्रांतीसूर्य सामाजिक संघटना बारामती या संस्थेकडून सर्वात प्रथम २०२२ मध्ये समाजभूषण पुरस्काराने तर २०२३ ला तथागत् ग्रुप बुलढाणा या सामाजिक संस्थेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन दर तीन महिन्याने रक्तदान करणे किंवा रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णास तातडीची आवश्यकता असताना रक्त उपलब्ध करून देणे, ही साखळकर यांचे नित्याचेच आहे. साखळकर यांची कन्या स्वरा हिने तायक्वांदोमध्ये केलेल्या उत्तुंग अशा कामगिरीमुळे तिला युथ आयडॉल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तायक्वांदोमध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीने विशेष ठसा उमटवणाऱ्या स्वराचा विशेष सन्मान करण्यात आला. स्वराने आजपर्यंत तायक्वांदोमध्ये २६ सुवर्णपदके, ७ रौप्यपदके तर ९ कास्यपदके मिळवून अल्पावधीतच सुवर्णकन्या होण्याचा मान मिळवला. ११ वर्षाच्या या चिमुरडीने केलेल्या या कामाची सीबीएस या संस्थेने घेतली. स्वरा पाचवीमध्ये शिकत असून, रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी आहे.www.konkantoay.com