
लोकसभेच्या माजी अध्यक्ष आणि चिपळूणच्या माहेरवाशीण सुमित्रा महाजन यांची चिपळूण लोटिस्माला भेट
लोकसभेच्या माजी अध्यक्ष आणि चिपळूणच्या माहेरवाशीण सुमित्रा महाजन यांनी नुकतीच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट दिली. यावेळी महाजन यांनी बाळशास्त्री जांभेकर सभागृह आणि तैलचित्रे पाहून समाधान व्यक्त केले.महापुरात वाचनालयाचे वस्तू संग्रहालय पूर्णपणे उध्वस्त झाल्यानंतर पुन्हा जिद्दीने, चिकाटीने नव्याने निर्मिती केलेले सभागृह पाहून महाजन यांनी आनंद व्यक्त केला. अशी कलात्मकता सार्वजनिक ठिकाणी फार कमी दिसते, असे मत व्यक्त करत लोटिस्माच्या कार्यकारिणीचे त्यांनी कौतूक केले. यावेळी महाजन यांना लोटिस्माच्यावतीने स्वातंत्र्य आंदोलनावर ग्रंथालयाने प्रकाशित केलेल्या चिपळूण १९४२ व नीला नातू यांनी कोकणकन्या आनंदीबाई पेशवे यांच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी भेट देण्यात आली. या घरगुती भेटीप्रसंगी त्यांच्यासमवेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, लोटिस्माचे प्रकाश देशपांडे, बापू काणे, सुरेश साठे, सरोज नेने तसेच ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होता.www.konkantoday.com