रत्नागिरी बाजारात आंबा, ओला काजू हजारावर,
आंब्याचा हंगाम एकीकडे सुरू असतानाच रत्नागिरी शहरानजिकच्या भागातून तयार आंब्याची शहरातील बाजारात आवक होत आहे. सध्या बाजारात आंबा आणि ओला काजू मुख्यत्वे विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती. यामुळे आंब्याला आलेल्या मोहोरावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव काही तालुक्यातील बागांमध्ये जाणवू लागला होता. त्यातच पावसाने काही ठिकाणी हजेरी लावल्याने बागायतदारांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. मात्र थंडीच्या प्रमाणात हळुहळू पोषक स्थिती निर्माण झाली. सध्या बाजारात १ हजार ते १५०० दरम्यान हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध असून ओला काजूचा गर १ हजार रुपये किलो आहे. काही दिवसांपूर्वी हाच दर १२०० ते १५०० दरम्यान होता. मात्र यात आता किंचितशी घसरण झाली आहे. शहरातील बाजारात पायरीची आवक तुलनेने कमी असून पायरी आंब्याचा दर ८०० ते १००० रुपये आहे. www.konkantoday.com