यंदा केलेल्या दाभोळे-कनकाडी रस्त्याची पहिल्याच वर्षी दुर्दशा.

यंदा केलेल्या दाभोळे-कनकाडी रस्त्याची पहिल्याच वर्षी दुर्दशा झाली आहे. जागोजागी उखडलेले डांबर, खचलेला रस्ता, सुमारे चार फूट रूंदीचे पडलेले चर यामुळे वाहनचालकांना वाहने चालवणे अवघड झाले आहे.दाभोळे-कनकाडी या सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या रस्त्याची ३० लाख रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात रस्ता चकाचक झाला; मात्र ठेकेदाराचा भोंगळ कारभार पाहिल्याच वर्षीच्या पावसाळ्यात उघड झाला आहे. या मार्गावरून डंपर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. त्यामुळे अवजड वाहनांच्या सततच्या प्रवासामुळे हा रस्ता जागोजागी उखडलेला आहे. मेघीफाटानजीक एका ठिकाणी तर रस्त्याखालचा भराव खचल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर सुमारे चार फूट रूंदीचा चर पडलेला आहे. वेगात आलेल्या वाहनांना त्याचा अंदाज नआल्यामुळे अपघातही घडत आहेत. या रस्त्याला कुठेही बाजूपट्टी नसल्याने समोरून आलेल्या वाहनाला जागा देताना चालकांची पंचाईत होत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर वाहून गेल्यामुळे खडी वर आलेली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button