मुंबई गोवा महामार्गावर बंद अवस्थेतील वाहनांमुळे अपघातांचा धोका कायम
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणामुळे वाहनचाकांचा प्रवास सुसाट झाला असला तरी भर रस्त्यातच बंद पडणार्या अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका कायम आहे. बंदावस्थेतील वाहनांवर ये-जा करणारे दुसरे वाहन आदळून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळण अपघाताच्या दृष्टीने शापितच बनले आहे. या अवघड वळणावर विशेषतः अवजड वाहनांना सातत्याने घडणार्या अपघातामुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. या ठिकाणी सातत्याने घडणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खाते टायर तंत्रज्ञानाचा अवलंबलेला मार्गही फोल ठरला आहे. याशिवाय अपघात रोखण्यासाठी १६ हून अधिक गतीरोधक बसवून देखील अपघता थांबेनासे झाले आहेत. www.konkantoday.com