मुंबईमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता

मुंबई : मागील काही दिवस कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असून पहाटे गारवा त्यानंतर दिवसभर उकाडा अशा वातावरणाचा मुंबईकरांना सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबई शहर तसेच उपनगरांत सध्या पहाटे गारवा जाणवत असून त्यानंतर दिवसभर उकाडा सोसावा लागत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर असणारे उन्हाच्या काहीलीने त्रस्त होत आहेत. दरम्यान, मुंबईत सोमवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती त्यानंतर आता पुन्हा दोन दिवस पारा ३७ अंशावर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदा हंगामातील सर्वाधिक कमाल तापमान हे सोमवारी नोंदवले गेले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button