
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या संथानचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या संथानचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु होते, पण त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.विशेष म्हणजे संथानचा मृत्यू राजीव गांधी यांच्या नावाने बनलेल्या हॉस्पिटलमध्येच झाला आहे. संथानने ज्यांना मारले, त्यांच्याच नावाच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू होणे योगायोगच म्हणावा लागेल.राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या संथानला दोषी ठरवण्यात आलं होतं. पण, त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. ५५ वर्षांच्या संथानचे जानेवरी महिन्यामध्ये लिव्हर फेल झाले होते. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला इतर काही आरोग्य समस्या देखील होता. त्याचा मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.www.konkantoday.com