पुणे महापालिकेचे पावणे चार कोटी थकले! नीलेश राणे यांची मालमत्ता सील
पुणे महानगर पालिकेने थकबाकी दारांवर धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचा दंडुका भाजप नेते नीलेश राणे यांना बसला आहे. राणे यांची डेक्कन येथील आर डेक्कन मॉल ही व्यावसायिक मालमत्ता असून या जागेचा तब्बल पावणे चार कोटी रुपयांचा कर थकवल्याने पालिका अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता सील केली आहे.पुणे महानगर पालिकेने शहरात थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात अनेक बड्या प्रॉपर्टी आणि जागांवर कारवाई करण्यात आली आहे. यात अनेक मोठ्या व्यक्तिंचा देखील समावेश आहे. नीलेश राणे यांची पुण्यात डेक्कन येथे आर डेक्कन नावाची व्यावसायिक मालमत्ता आहे. या ठिकाणी फूड मॉल, चित्रपट गृह, तसेच अनेक व्यावसाईक गाळे आहेत. या मालमत्तेवरील पालिकेचा कर राणे यांनी थकवला आहे. या जागेवरतब्बल ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी या जागेवर आहे. त्यामुळे पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई करत ही मालमत्ता सील केली आहे.पुणे महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहचले. त्यांनी ही मालमत्ता सील केली. या पूर्वी कर भरण्या संदर्भात नोटिसा देखील पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिस पाठवून देखील कर न भरल्याने पालिकेने मालमत्ता सील करत कारवाई केली आहे.www.konkantoday.com