
दापोली तालुक्यातील एका गावात विनयभंग करून महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न
दापोली तालुक्यातील एका गावात विनयभंग करून महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका गावातील महिला बकर्या चरवण्यासाठी जंगलात गेल्या असताना त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न स्वरूप मोरे याने केला. पीडीत महिला ही जंगलमय भागात बकर्या घेवून गेली होती. त्यावेळी स्वरूप मोररे याने वाईट हेतूने पीडीत महिलेचा हात धरून तोंड दाबत तिला ओढत जंगलात नेले. यावेळी पीडीत महिलेने विरोध केला असता त्याने तिला दगडावर आपटून दगडाने मारून जखमी केले. जवळ असलेल्या लायटरने पीडीत महिलेला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिची साडी पेटवली. यात ती महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला उपजिल्हा रूग्णालयात दापोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे www.konkantoday.com