
चिपळूण शहरातील पेठमाप भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा
चिपळूण शहरातील पेठमाप भागाला आता कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नियमित व स्वच्छ पाणी द्या या मागणीचे पुन्हा नागरिकांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन दिले आहे. आठ दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनानुसार फुटलेल्या पाईपलाईनची दुरूस्ती करून दुर्गंधीयुक्त पाण्यावर तात्पुरता उपाय काढण्यात आला आहे.या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षापासून पेठमाप भागाला अधूनमधून दुर्गंधीयुक्त, खारट, मचूळ व पिण्यास योग्य नसलेल्या पाण्याचा नगर परिषदेकडून पुरवठा होत आहे. याबाबत सातत्याने निवेदने देवूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. www.konkantoday.com