गुहागर तालुक्यात एकूण ३० लाखांची थकबाकी
गुहागर तालुक्यात एकूण ३० लाखांची थकबाकी असून तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत ९ लाखाची थकबाकी असल्याचे समोर येत आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी गुहागर महावितरणकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून कर्मचार्यांबरोबरच अधिकारीही वसुलीत सहभागी झाले आहेत. या मोहिमेची सुरूवात शृंगारतळी बाजारपेठेतून करण्यात आली.या मोहिमेत चिपळूणचे विभागीय वित्त व लेखा अधिकारी अशोक मोहिते, गुहागरचे उपविभागीय अधिकारी सुनील सूद, गुहागर कार्यालयाचे सहाय्यक अभियंता अल्विन फर्नांडीस, शृंगारतळी सबस्टेशनचे शाखा अधिकारी सहाय्यक अभियंता मंदार शिंदे, रोहित आखाडे, शिल्पा साळवी व सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.www.konkantoday.com