आंगणेवाडी जत्रेसाठी १ मार्चला कोकण मार्गावर चालवण्यात येणार्‍या**एलटीटी करमाळी रेल्वे आरक्षण खुले

सिंधुदुर्गातील २ मार्चच्या आंगणेवाडी जत्रेसाठी १ मार्चला कोकण मार्गावर चालवण्यात येणार्‍या लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी आंगणेवाडी फेस्टीव्हचे सोमवारपासून आरक्षण खुले झाले आहे. ०१०४३/०१०४४ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी फेस्टीव्हल स्पेशल १ मार्च रोजी रात्री १०.१५ वाजता एलटीटीहून सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी १० वा. करमाळी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात ३ मार्च रोजी करमाळी येथून दुपारी ३.२० वाजता सुटून पहाटे ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. २१ एलएचबी डब्यांच्या स्पेशलला ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्‍वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम आदी स्थानकात थांबणार आहेत. या स्पेशलचे आरक्षणही खुले झाल्याने दिलासा मिळाला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button