रत्नागिरीतील साळवीस्टॉप येथे उभे राहिलेय स्मार्ट गार्डन
रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील नगरोत्थान योजनेंतर्गत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील साळवीस्टॉप परिसरात युनिटी ट्युलिप इमारती बाहेरील सुलोचना रामचंद्र झगडे कॉर्नर गार्डनचे उदघाटन राज्याचे उद्यागेमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या गार्डनसाठी सामंत यांच्या माध्यमातून १२ लाखांचा निधी प्राप्त झाला होता.हे नावीन्यपूर्ण कार्डन नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. ५ मध्ये लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. पूर्वी त्याठिकाणी झाडीझुडपे वाढली होती. आणि त्या ठिकाणी कचराही टाकला जात होता. या परिसरातील नागरिकांची गरज ओळखून शिवसेनेचे शहर संघटक तथा उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी या गार्डनच्या कामासाठी लक्ष दिले. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. www.konkantoday.com