*रत्नागिरीतील स्टरलाईटची जागा उद्योग खात्याकडे वर्ग,200 एकर जागेवर संरक्षण दलाचा हत्यारे तयार करण्याचा प्रकल्प उभारणार -उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाना यश

तीस वर्षांपूर्वी बंद पडलेल्या स्टरलाईट कंपनीची 500 एकर जागा पडून होती. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असल्यामुळे जागेचा उपयोग कोणालाच होत नव्हता. परंतु आता न्यायालयाच्या आदेशानंतर ही जागा उद्योग खात्याकडे वर्ग झाली आहे. 500 एकरपैकी 200 एकर जागा संरक्षण दलाला दिली जाणार असून या जागेवर देशाच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्यारे, रणगाडे, बोटी निर्माण करणारा प्रकल्प उभारण्यात येणार असून येत्या 15 दिवसात संरक्षण दल व राज्य सरकारचा उद्योग विभाग यांच्यामध्ये रत्नागिरीत करार होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिली.* स्टरलाईट कंपनीला स्थानिक जनतेने अल्पदरात जागा दिली होती. कंपनीची निम्मी उभारणी झाल्यानंतर प्रदुषणाच्या मुद्द्यावरून रत्नागिरीकरांनी कंपनीला विरोध केला. जनसंघर्ष समितीच्या वतीने कंपनीवर विराट मोर्चा काढून मोर्चेकऱ्यांनी कंपनी पेटवून दिली होती. त्यानंतर कंपनी बंद झाली. अनेक वर्षे जागा पडून राहिल्यामुळे एमआयडीसीने कंपनीला नोटीस पाठवून जागा परत करण्याची सूचना दिली होती. त्या विरोधात कंपनीने उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अंतिम निर्णय देताना न्यायालयाने ही जागा उद्योग विभागाला पुन्हा दिली आहे. सुमारे 40 वर्षांपूर्वी एकरी 500 रुपये प्रमाणे स्थानिकांनी कंपनीला जागा दिली होती. त्या बदल्यात त्यांना कंपनीत नोकरीची संधी देण्यात येणार होती. परंतु कंपनी बंद पडल्यानंतर जागेसह नोकरीची संधी गेल्यामुळे स्थानिकांनी जागा परत करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्थानिकांनी आंदोलनही केले होते. जागा परत न देताना आताच्या बाजारभावाप्रमाणे जागेचा मोबदला देण्याचे आश्वासन ना.उदय सामंत यांनी दिल्यानंतर स्थानिकांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल 30 वर्षांनंतर स्टरलाईटची जागा उद्योग विभागाच्या ताब्यात आल्यानंतर 500 एकर 200 एकर जागेवर संरक्षण दलाचा हत्यारे तयार करण्याचा प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा ना.उदय सामंत यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रकल्पासाठी आग्रही राहिले तरच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. उद्योग जगतात रत्नागिरीचे नाव विरोधक म्हणून निर्माण झाले आहे. पिठाची गिरण काढायची असेल तरीही रत्नागिरीत विरोध होतो असा मेसेज देशभर गेला आहे. त्यामुळे नवे उद्योजक रत्नागिरीत येत नाहीत. विरोधाची ओळख पुसून काढण्यासाठी रत्नागिरीकरांनी प्रकल्प समर्थनासाठी रस्त्यावर येण्याची आवश्यकता असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.www.konkantoday com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button