मिरकरवाडा येथील घर फोडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयिताच्या शहर पोलिसांनी दोन दिवसांच्या आत मुसक्या आवळल्या
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील घर फोडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयिताच्या शहर पोलिसांनी दोन दिवसांच्या आत मुसक्या आवळल्या . हा संशयित सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शहर पोलिस ठाण्यात सन २०१६ ते २०२० या कालावधीत पाच गुन्हे दाखल आहेत . सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान लियाकत कोतवडेकर ऊर्फ डॉन ( २९ , रा . खडप मोहल्ला , रत्नागिरी ) असे या प्रकरणात पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे . याबाबत रुक्साना इंतिखाब पठाण ( ५३ , रा . खडप मोहल्ला मिरकरवाडा , रत्नागिरी ) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती . त्यानुसार , शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी त्या त्यांचा भाऊ मजगावकर यांच्या घरी झोपायला गेल्या होत्या . शनिवारी सकाळी त्या घरी परतल्या असता त्यांना आपल्या घरात चोरी होऊन रोख ३ लाख २५ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले होते . याप्रकरणी शहर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून आरोपीला अटक केली .www.konkantoday.vom