मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला.मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आंदोनावरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला. जरांगेच्या वक्तव्यावरून सभागृहात वाद झाला.विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीजरांगेंच्या आंदोलनावर बोलताना अशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटलं की, कोपर्डी केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार हे सांगितलं आम्हाला असा आरोप आहे. पिस्तुल कोणाकडे सापडली, लोकप्रतिनीधींची घर जाळली, याची चौकशी नको का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. यासोबत एसआयटी लावा, अशी मागणीही केली आहे. याच्या मागे या सभागृहातील सदस्य कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अमित साटम यांनीही केली आहे.जरांगेंच्या आंदोलनावर एसआयटी चौकशीचे आदेशविधानसभा अध्यक्षांनी जरांगेंच्या आरोपांची चौकशी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हिंसा अथवा हिसंक वक्तव्य याला लोकशाहीत स्थान नाही. यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे. याच गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल एसआयटी चौकशी करावी, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.www.konkantoday.com