देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षा कदमने तब्बल नऊ वेळा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद पटकावले
मौजे देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षा कदमने तब्बल नऊ वेळा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबई शिवाजी पार्क जिमखाना व महाराष्ट्र कँरम असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या १५ व्या राज्य मानांकन कँरम स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील आकांक्षा कदम सहभागी झाली होती तिने चमकदार कामगिरी करत असे अभूतपूर्व असे यश संपादन केले. आकांक्षाने चैताली सुवारे, काजल कुमारी यांना पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम फेरीत आकांक्षाने ठाण्याच्या समृद्धी घाडीगांवकर वर तिन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात 16-08-13, 24-08-09, 25-07-01 असे नमवून नवव्यांदा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद पटकविले. आकांक्षाने 2022 मध्येही शिवाजी पार्क जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.. शिवाजीपार्क येथिल तिचे हे दुसरे विजेतेपद आहे www.konkantoday.com