जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या भरतीचा अखेर नारळ फुटला सोमवारी अंतिम यादी जाहीर,1 हजार 10 जणांचा समावेश
*जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या भरतीचा अखेर नारळ फुटला सोमवारी अंतिम यादी जाहीर,1 हजार 10 जणांचा समावेश*_______________________ रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या भरतीचा अखेर नारळ फुटलाभरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवारी अंतिम यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 1 हजार 10 जणांचा समावेश आहे. येत्या आठ दिवसात या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून रुजू होण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. यामुळे शिक्षण विभागाला दिलासा मिळाला आहे.प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. पवित्र पोर्टलवर अंतिम टप्प्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारांना 14 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. ती पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत.शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार या भरतीमध्ये जिल्हापरिषदेला एकुण जागांपैकी 70 टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये 1 हजार 451 मराठी माध्यमाची आणि 115 उर्दू माध्यमाची पदे रिक्त आहेत. तशी मागणी केली होती. मात्र शासनाने एकूण 1 हजार 10 पदांना मंजूरी देत अंतिम यादी सोमवारी जाहीर केली. या सर्व उमेदवारांची कागद पडताळणी येत्या आठ दिवसात पूर्ण होणार आहे. समुपदेशनाद्वारे त्यांना शाळा देण्यात येणार आहे. 1 हजार शिक्षक मिळाल्यामुळे शिक्षण विभागाला थोडासा दिलासा मिळाला आहे. www.konkantoday.com