
चिपळूणातील नेत्र तपासणीचा २०० वाहनचालकांना लाभ
चिपळूण:- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ३५ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत चिपळुणात रिक्षा, प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिराचा सुमारे २०० हून अधिक वाहनचालकांनी लाभ घेतला.शहरालगतच्या कापसाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे हे शिबिर झाले. शिबिरात इन्फिगो आय हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक उदय साळुंखे, सहाय्यक मोटार वाहन वाहन निरीक्षक प्रतीक चोपडे, निखिल पुजारी, इन्फिगो आय हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारी, चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले, प्रशांत गोरिवले, जितेंद्र पवार, प्रशांत कदम, संजय जोशी, बाबा संसारे आदींनी प्रयत्न केले.www.konkantoday.com