
चिपळुणात राडेबाजी, समर्थकांची धरपकड थंडावली?
आमदार भास्कर जाधव व भाजपचे नेते नीलेश राणे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या राडेबाजीत समावेश असलेल्यांची शोधमोहीम सुरू असताना गेल्या ४ दिवसात एकाही समर्थकाला अटक झालेली नाही. यातूनच राडेबाजीत समर्थकांची धरपकड थंडावली का? असा प्रश्न पुढे येत आहे. दरम्यान, यापूर्वी अटक केलेल्या ११ समर्थकांच्या जामिनासाठी आज सुनावणी होत आहे.माजी खासदार नीलेश राणे हे गुहागर-शृंगारतळी येथील सभेला जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाजवळ स्वागत कार्यक्रमादरम्यान हा राडा झाला होता. जाधव हे राणे समर्थक आमनेसामने येवून एकमेकांना भिडल्यानंतर तुफान दगडफेकीसह वाहनांच्या तोडाफोडीचा प्रकार घडला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तब्बल ४०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय व्हीडिओ, छायाचित्रणातून दगडफेक करणार्यांची ओळख पटताच पोलिसांनी समर्थकांची धरपकड सुरू केली होती. यातूनच ११ जणांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. www.konkantoday.com