
गुहागरमधील मनरेगाचा निधी रखडला,लाभार्थी वंचित
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील साहित्याचा तब्बल १९ लाख २० हजार रुपये निधी रखडला असून गेले ५ महिने लाभार्थी वाट पहात आहेत. तर वारंवार निधी केव्हा येणार म्हणून पंचायत समितीकडे विचारणा करताना दिसून येत आहेत.रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना (एमआईजीएस) ही योजना राबवण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कामगार नोंदी करून त्या त्या गावात ६० टक्के अकुशल व ४० टक्के कुशल (यांत्रिकी) द्वारे कामे घेतली गेली. याप्रमाणे गुहागर तालुक्यात शोषखड्डे, गोठा, विहीर, नॅपेड, गांडूळ खत, फळबाग लागवड आदी तब्बल ४६१ कामे घेण्यात आली. या कामांची मंजुरीची रक्कम देण्यात आली. परंतु यांत्रिकीवर (कुशलवर) खर्ची पडलेली रक्कम ऑक्टोबर २०२३ पासून रखडली आहे.www.konkantoday.com