कोकण मार्गावरून धावणार्या ३५ रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांचा प्रवास प्रदूषणमुक्त अन वेगवान
कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरण पूर्ण झालेल्या रोहा ते ठोकूरदरम्यान, प्रवासी गाड्या डिझेलऐवजी विद्युतशक्तीवर चालवण्यात येत आहेत. आतापर्यंत कोकण मार्गावरून धावणार्या ३५ रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांचा प्रवास प्रदूषणमुक्त अन वेगवान झाला आहे. आता केवळ मोजक्याच रेल्वेगाड्या कोकण मार्गावर डिझेलवर धावत आहेत. या गाड्यांसाठी विद्युत इंजिनाची उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.इंधन बचत, प्रदूषण टाळण्यासह रेल्वेगाडीला डिझेल लोको जोडण्याच्या कटकटीतून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी २०१५ पासून रोहा ते ठोकूरदरम्यान ५ टप्प्यात विद्युतीकरणाचे काम हाती घेत पूर्ण करण्यात आले होते. मात्र उपरेल्वेस्थानकांची कामे प्रलंबित राहिल्याने प्रवासी, गाड्या विजेवर चालवण्याच्या नियोजनात थोडा बदल होता. याचमुळे रेल्वेगाड्या डिझेलऐवजी विद्युत इंजिनावर चालवण्यासाठी २०२२ उजाडले होते. www.konkantoday.com