कासव म्युझियम होण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून ५० लाख रूपयांचा निधी-दीपक केसरकर

वेंगुर्ले, -कासवांच्या प्रजननाचा भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी बीचची ख्याती दूरवर पसरली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक कासवांना व त्यांच्या पिल्लांना पाहण्यासाठी येतात. पर्यटनदृष्ट्या स्थानिकांचा विकास साधण्यासाठी या भागात कासव म्युझियम होण्यासाठी सिधुरत्न योजनेतून ५० लाख रूपयांचा निधी देऊ, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘कासव महोत्सवा’च्या उद्‍घाटनप्रसंगी दिली.वनविभाग सावंतवाडी, वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत वायंगणी बीच येथे नुकताच ‘कासव महोत्सव’ पार पडला. यावेळी सरपंच अवी दुतोंडकर, उपसरपंच रविद्र धोंड, सावंतवाडी उपवनसंरक्षक एस. एन. रेड्डी, सहाय्यक वन संरक्षक डॉ. सुनिल लाड, कुडाळ वन अधिकारी संदिप कुंभार, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, कडावल वनक्षेत्रपाल अमिट कटके, प्रांताधिकारी हेमंत निकम, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, अप्पर तहसिलदार मोनिका कांबळे, वेंगुर्ले तहसिलदार ओंकार ओतारी, मठ वनपाल सावळा कांबळे, वनरक्षक सूर्यकांत सावंत, वेंगुर्ले पोलिस निरीक्षक संदिप भोसले आदी उपस्थित होते.यावेळी कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सुहास तोरस्कर, प्रकाश साळगावकर या कासवमित्रांचे प्रमाणपत्र देऊन श्री. केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या दोन्ही कासवमित्रांना प्रत्येकी १० हजार रूपये तर कासव संवर्धनाचे काम उत्कृष्टपणे करणाऱ्या वायंगणी ग्रामपंचायतीस कासव संवर्धनास प्रोत्साहनपर २५ हजार रूपये बक्षिस स्वरूपात जाहीर केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button