
आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान तर्फे राज्यव्यापी एकदिवशीय उद्योगिनी परिषदेचे आयोजन
आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे जागतिक मुंबईत दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या वैद्य सभागृहात राज्यव्यापी एकदिवशीय उद्योगिनी परिषदेचे आयोजन २ मार्च रोजी केले आहे.या कार्यक्रमात उद्योगिनी पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जाणार आहे.परिषदेत महाराष्ट्र व गोवा राज्यातून महिला उद्योजक संघटनांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. सुमारे एक हजार महिला उद्योजक या परिषदेत सहभागी होतील. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भरविण्यांत येणार आहे. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे गेली २६ वर्षे महिलांना उद्योगिनी बनण्यासाठी चर्चासत्रे, परिसंवाद, उद्योजकता समुपदेशन, अभ्यास दौरे, परिषदा यांचे आयोजन केले जात आहे. महिला उद्योजकांनी बनविलेल्या विविध उत्पादनांना प्रदर्शनाद्वारे बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने मोलाची कामगिरी केली आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, नाशिक व पुणे या सहा विभागातील प्रत्येकी एक अशा सहा यशस्वी उद्योजक महिलांना व दोन पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे.या परिषदेमध्ये सकाळी ९ वाजता नाव नोंदणी, १० वाजता उद्घाटन, सकाळी ११ वाजाता शासकीय योजना व उद्योगसंधी, दुपारी ३ वाजता उद्योगाचे तंत्र आणि मंत्र आणि सायंकाळी ५ वाजता उद्योगिनी गौरव पुरस्कार वितरण केले जाणार आहे. या परिषदेत रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले आहे.www.konkantoday.com