
आज ‘मराठी भाषा गौरव दिन’; मातृभाषेचा गौरव
आज 27 फेब्रुवारी, आजचा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न म्हणजेच, ‘ कुसुमाग्रजअर्थातच, महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर. यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. www.konkantoday.com