*नशेतल्या तरुणींचा व्हिडीओ बनवणाऱ्या ‘पिट्याभाई’ विरोधात महिला पत्रकाराची महिला आयोगाकडे तक्रार*

___मुळशी पॅटर्न सिनेमातील पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशी याने काही दिवसांपुर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये पुण्यातील वेताळ टेकडीवर दोन मुली नशेत असल्याचे दिसत आहे.रमेश परदेशी याने त्या मुलींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यातील एक मुलीची अवस्था अत्यंत गंभीर होती. दरम्यान त्या मुलींचा चेहरा दाखवल्याने रमेश परदेशी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्याच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिला पत्रकार नेहा पुरव यांनी यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्याचे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. एक महिला म्हणून आणि एका तरुण मुलीची आई म्हणून मी या प्रकाराने खूपच अस्वस्थ झालेय.. पुण्यात 2मुली नशेच्या अमलाखाली सो कॉल्ड संस्कृती रक्षकांना आढळून आल्या… सगळ्यात आधी त्या मुलींनी जे केले ते अत्यंत चूकच आहे त्या बद्दल त्यांना माफ करताच येणार नाही पण या मुलींचे वय आणि त्यांची पुढची करिअर, पुढील आयुष्य बघता हा व्हीडिओ viral करणे किती योग्य होते? त्यांचे चेहरे न दाखवता स्वतःच्या समाजसेवेचा डांगोरा पिटता आला नसता का? ह्या प्रकारात मुलींचे फोटो दाखवणे हा गुन्हा आहे.. या मुलींच्या पालकांना सांगून आणि या मुलींचे काउन्सल्लिंग करून योग्य मार्ग निवडता आला नसता का? असा प्रश्न नेहा यांनी उपस्थित केलाय. मी या प्रकारानंतर पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशन मधुन पत्रकार म्हणून माहिती घेतली, तेव्हा या मुली बिअर प्यायला होत्या आणि पोटात अन्न नसल्याने त्यांना नशा आल्याचे पोलिसानी सांगितले.. या मुलींनी drugs घेतले नव्हते… मी मुलींना पाठीशी घालत नाही पण अशा प्रकारे व्हीडिओ viral करण्याला माझा आक्षेप आहे… मी महिला आयोगाकडे एक महिला म्हणून तक्रार नोंदवली असल्याचे नेहा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button