
*आंब्याबरोबर दरारा असणार्या काजूचे दर कोसळले*
___कोकणातील आंब्याबरोबर दरारा असणार्या काजूचे दर कोसळले असून सध्या १२० ते १३० रूपये भाव दिला जात असल्याचे बागायतदारांमधून समोर आले. त्यामुळे काजू बागायतदारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वन्यप्राणी व इतर नुकसानीमुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हमीभावात वाढ होणे आवश्यक असल्याचे बागायतदारांमधून समोर आले आहे.तसे पाहिले तर यावर्षी काजू उत्पादन कमी झाल्याचे बागायतदारांकडून समोर आले आहे. त्यात माकडांचा त्रास आहेच. शिवाय बदलणार्या वातावरणामुळे फळांवरही परिणाम होत आहे. ढगाळ वातावरण, सकाळच्या सत्रामध्ये पडणारे दाट धुके-दव आणि गेल्या काही दिवसांपासून तापमानात झालेला बदल अशा अनेक कारणामुळे काजूच्या उत्पादनात घट झाली आहे. www.konkantoday.com