
*प्रभानवल्ली गावचा सुपुत्र असलेल्या आलोक कृष्णा ब्रीद याने तिसर्या खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदकांना गवसणी घातली*
_____किक बॉक्सिंग स्पर्धेत लांजा आंतरराष्ट्रीय स्तरावरलांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावचा सुपुत्र असलेल्या आलोक कृष्णा ब्रीद याने तिसर्या खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदकांना गवसणी घालत संपूर्ण कोकणासह लांजा तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे.सायन मुंबई येथे सध्या वास्तव्यास असणार्या आणि लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली हे मूळ गाव असलेल्या आलोक कृष्णा ब्रिद याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी सुवर्ण पदकासह विजय मिळवला आहे. शितो रियू स्पोर्टस कराटे अँण किक बॉक्सिंग असोसिएशनच्या गतिशील युवा प्रतिभावान आलोक कृष्णा ब्र्रीद याने तिसर्या खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दुहेरी सुवर्ण पदक जिंकून परिवाराचा गौरव केला आहे. www.konkantoday.com