*चीनची मच्छिमार नौका रत्नागिरी किनार्यावर आल्याची अफवा,यंत्रणांची तारांबळ*_
___रत्नागिरी नजिक कोकण किनार्यालगत चीनची नौका आढळल्याचा संदेश आल्यानंतर मत्स्य विभागासह पोलीस, तटरक्षक दलाच्या यंत्रणा अलर्ट झाली. तपासणी अंती सोशल मिडियावर आलेले फोटो आणि व्हिडिओ भारताच्या किनार्यापासून पाचशे नॉटिकल मैलांच्या बाहेरील असल्याची खात्री झाली. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी निश्वास सोडला. या गोंधळात सलग दोन दिवस सागरी सुरक्षा विभागासह मत्स्य विभागाच्या पथकांनी जिल्ह्याच्या हद्दीत १२ नॉटिकल मैलाची किनारपट्टी पिंजून काढली होती.मच्छिमारांकडून दि. १५ फेब्रुवारी २०२४ ला चीन देशाच्या मच्छिमारी नौका रत्नागिरी समुद्रात असल्याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून पुढै आली. ही माहिती रत्नागिरीतील मत्स्य विभागाच्या अधिकार्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर तत्काळ मत्स्य विभागाच्या दोन परवाना अधिकार्यांना सागरी सुरक्षेचे चार पोलीस अंमलदारांसह सुरक्षा बोटीमधून पाठविण्यात आले होते. चीनची नौका आढळल्याचा संदेश मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळपासून मत्स्य विभागाच्या अधिकार्यांनी पोलिसांसह देवगडपर्यंत संपूर्ण समुद्रकिनारा तपासला. मात्र मिळालेल्या फोटोतील एकही चिनी नौका सापडली नाही. याबाबत पोलिसांसह तटरक्षक दलाकडूनही शोध मोहिम राबविण्यात आली. कसून तपासणी केल्यानंतरही समुद्राच कोठेच नौका सापडल्या नाहीत. मत्स्य विभागाच्या अधिकार्यांनी युटीएसवरही नौकांची चाचपणी केली. मात्र त्यावरही कोणते लोकेशेन आढळले नाही. यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. सांगितलेल्या लोकेशनवर मच्छिमारांकडून पाठविण्यात आलेले फोटो व व्हिडिओ हे आंतरराष्ट्रीय हद्दीदील असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. चिनी नौकांमुळे सतर्क झालेल्या सर्वच यंत्रणांनी निश्वास टाकला. www.konkantoday.com