*कोकण मार्गावर २३ रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक*

____कोकण मार्गावरील सावर्डे-रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सकाळी ९.३० या वेळेत अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.या मेगाब्लॉकमुळे १२६१७ क्रमांकाची एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस २२ फेब्रुवारी रोजी मडगांव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. २०९२३ क्रमांकाची तिरूनेलवेली गांधीधाम एक्स्प्रेस २२ रोजी मडगांव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button