
*अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या महिला रस्त्यावर उतरणार*
_____गुहागर येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सभेत माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेना पक्षातील नेत्यांबद्दल गलिच्छ शब्द वापरले. एखादी मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्तीच नीलेश राणे यांच्यासारखी वक्तव्य करू शकते. यापुढे ठाकरे कुटुंब अथवा शिवसेनेच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या महिला रस्त्यावर उतरतील, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्र महिला संपर्क संघटक नेहा माने यांनी दिला.खासदार विनायक राऊत यांचे रत्नागिरी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मानेबोलत होत्या. माने पुढे म्हणाल्या की, भाजपा सोबत युतीत असताना आम्ही प्रचारासाठी एकाच व्यासपीठावर होतो. पण गुहागर येथील भाजपची सभा पाहताना गल्लीतील भांडण चालले असल्यासारखे वाटत होते. नीलेश राणे यांनी रश्मी ठाकरे, भास्कर जाधव यांच्या आई, पत्नी यांच्याबद्दल गलिच्छ शब्द वापरले आहेत. त्यांचे हेच संस्कार आहे का? असा सवाल करत आम्ही नीलेश राणे, यांच्या वक्तव्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करणार आहोत,असे नेहा माने यांनी सांगितले. www.konkantoday.com