
धुळे प्रकरणामुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या गौरवशाली लौकिकाला गालबोट, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधिमंडळाच्या गौरवशाली लौकिकाला गालबोट लावणार्या धुळे विश्रामगृहातील कोट्यवधी रुपयांच्या रोकड प्रकरणी विधिमंडळाच्या अंदाज समिती सदस्यांवर झालेल्या गंभीर आरोपांबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना खरमरीत पत्र लिहून केली आहे.
विधिमंडळाला देशात आगळी वेगळी प्रतिष्ठा लाभली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात देश पातळीवर नेतृत्व देणारे नेते या विधिमंडळाने राष्ट्राला दिले आहेत, ज्यांनी आपल्या महान कर्तृत्वाद्वारे आणि सर्वकष कामगिरीने या विधिमंडळाला उच्चस्तर व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. परंतु, विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर असताना तेथील विश्रामगृहातील एका खोलीमध्ये १ कोटी ८५ लाखांची रोकड आढळून आली. याहीपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आलेली होती, अशी चचर्चा ऐकावयास मिळते, पण ज्या खोलीत रोकड आढळून आली, ती खोली अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार श्री. अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या नावावर आरक्षित होती. ही रक्कम समितीतील सदस्यांना देण्यासाठी विश्रामगृहात ठेवल्याचा आरोप केला जात आहे, ही बाब अतिशय गंभीर असून महाराष्ट्र विधिमंडळाच्या गौरवशाली लौकिकाला गालबोट लावणारी आहे, असे मला वाटते.www.konkantoday.com