
*रत्नागिरीत महिलेची दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक*
रत्नागिरी शहरातील जेलरोड येथील महिलेची अज्ञाताने तब्बल १ लाख ५८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना २३ आणि २४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आली असून याबाबत पीडीत महिलेने शनिवार दि. १७ फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.४७ रोजी ग्लोबल मेडिकल आरोग्य मंदिर येथे असताना अज्ञाताने पीडीतेच्या बँक खात्यातून प्रथम ९८ हजार ९९९ रुपये आणि नंतर १ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने काढले. त्यानंतर दुसर्या दिवशी दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.४८ वा. पीडीत महिला जेल रोड येथील महाडवाला बंगल्यासमोर असताना अज्ञाताने त्यांच्या बँक खात्यातून ४९ हजार ९९९ त्यानंतर ८ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून एकूण १ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्र्रकरणी महलेने पावणे दोन महिन्यानंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com