*प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्या परप्रांतीय फेरीवाल्यांचे परवाने रद्द करा -शौकत मुकादम *
चिपळूण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना खाद्यपदार्थ विक्रेत्यांसंबंधीत जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, ही गोष्ट लांछनास्पद आहे. मला अनेक प्रवाशांचे फोन आले तेव्हा मी खात्री केल्यानंतर वस्तुस्थिती खरी आहे हे समजले. प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्या परप्रांतीय फेरीवाल्यांचे परवाने त्वरित रद्द करावेत, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या फेरीवाल्यांना कुणी दिला. या पूर्वी एक फेरीवाला पावाच्या लादीवर पाय ठेवून झोपला होता. तर दुसर्या फेरीवाला फलाटावरील बाकडयावर झोपला असून त्याच्याकडील भजी ट्रेसहीत पडलेली दिसत आहेत. व ती भजी प्रवाशांनी जाब विचारताच पुन्हा ट्रेमध्ये गोळा करून घेताना दिसत आहे. प्रवाशांनी व आरपीएफच्या जवानाने हटकताच ती कचर्याच्या डब्यात टाकली. हा प्रकार करणार्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की अन्य भेसळ अधिकारी तसेच पोलीस झोपा काढत आहेत का? फेरीवाल्यांची सहा महिन्याची मेडिकल टेस्ट करावी लागते, ती झालेली आहे की नाही. ज्या स्टॉलधारकांचे फेरीवाले आहेत त्यांच्या स्टॉलचा परवाना रद्द करण्यात यावा व प्रवाशांच्या जीवाशी खेळून खाद्यपदार्थ विकणार्या परप्रांतीयांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. www.konkantoday.com