*वंचित बहुजत आघाडी पक्षाच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी विशाल शांताराम मोरे यांची निवड*
___वंचित बहुजत आघाडी पक्षाच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी विशाल शांताराम मोरे यांची निवड करण्यात आली आहे. वंचितचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांनी या निवडीची घोषणा केली. कुणबी समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांनी वंचितच्या गुहागर तालुका कार्यकारिणीची निवड केली असून उपाध्यक्षपदी भूषण पवार यांची तर महासचिवपदी विनोद पवार, सहसचिवपदी सुरेश मोहिते, कोषाध्यक्षपदी विजय पवार, प्रमुख संघटकपदी सुदेश कांबळे, सहसंघटकपदी अभिजित केतकर, प्रमुख सल्लागारपदी शरद जाधव, सह. सल्लागारपदी समीर पवार, मनोज पवार, प्रसिद्धीप्रमुखपदी सुगंधा मोहिते, सदस्यपदी सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, अरविंद जाधव यांची निवड करण्यात आली आहे.www.konkantoday.com