*राजापुरात कर चुकवणार्‍यांवर कडक कारवाई*

___राजापूर शहरातील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी राजापूर नगर परिषदेने धडक मोहीम आखली असून जे नागरिक थकीत आहेत त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तर तोडण्यात आलेले नळ कनेक्शन परस्पर तोडून पाण्याचा वापर करणार्‍या नागरिकांकडून पाच हजार रुपये दंड वसुलीचाही इशारा दिला आहे.राजापूर शहरातील मिळकतधार यांच्या मालकीचे अथवा मिळकतीवरील संबंधित भोगवटदार यांची प्रलंबित मालमत्ता कर व पाणीपट्टी विषयक करांची रक्कम वसुली करण्यासाठी शासनाकडून प्राप्त सुचना मार्गदर्शनानुसार सक्त उपाययोजना करणेत येत असून याबाबत वसुलीपथके नेमून जप्ती सारखी कारवाई व नळसंयोजन बंद करणेची कार्यवाही राजापूर नगर परिषदेकडून सुरू करण्यात आली  असल्याची माहिती राजापूर नगर परिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी दिली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button