
*राजापुरातील सोलो लावणी नृत्य स्पर्धेमध्ये इचलकरंजीतील अनुष्का भंडारीने पटकावले विजेतेपद”
रिक्षा सेना चालक मालक संघटना राजापूर, रिक्षा चालक मालक सौभाग्यवती संघटना राजापूरच्यावतीने आयोजित सोलो लावणी नृत्य स्पर्धेमध्ये बहारदार लावणीनृत्य करणार्या इचलकरंजी येथील अनुष्का भंडारी हिने विजेतेपद पटकाविले. तर सातारा येथील सृष्टी जाधव व कणकवली येथील पूर्वा मिस्त्री यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक तर महाड येथील मनाली निवलेकर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.गुरूवारी राजापूर शहरातील जवाहर चौकामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. रिक्षा सेना चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे, रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कदम, सुभाष गुरव, संतोष हातणकर, विजय गुरव, समीर शिंदे, सुशांत मराठे, बबली दुधवडकर, माजी नगरसेवक जितेंद्र मालपेकर, स्पर्धा परीक्षक प्रा. साळवी, वर्षा गोवळकर यांच्यासह रिक्षा चालक मालक संघटना, सौभाग्यवती महिला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा व्यावसायिक आदि उपस्थित होते.www.konkantoday.com