
युवा विश्वचषक भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम अंतिम सामन्यात खेडच्या सुपुत्राची पंचगिरी
खेड तालुक्यातील शिव गावचे सुपुत्र अल्लाउद्दीन पालेकर यांनी अंडर १९ विश्वचषकात भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यातील लढतीत पंच म्हणून काम पाहिले.
अल्लाउद्दीन पालेकर यांचे वडील नोकरीनिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर ते तेथेच स्थायिक झाले. अल्लाउद्दीन पालेकर यांनी दक्षिण आफ्रिकेतच शिक्षण घेत २०२२ मध्ये भारताविरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दुसर्या कसोटी सामन्यातून पंच म्हणून पदार्पण केले. तेव्हापासून ते खर्या अर्थाने प्रकाशझोतात आले. ते क्रिकेट विश्वातील ४९७ वे व दक्षिण आफ्रिकेसाठी ५७ वे पंच ठरले आहेत.
यापूर्वी त्यांनी २०१४-१५ मध्ये रणजी क्रिकेट सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियममध्ये पंच म्हणून काम पाहिले होते. पंच होण्यापूर्वी ते क्रिकेटचे सामने देखील ते खेळले आहेत. २००६ पर्यंत साऊथ आफ्रिकेतील टाटन्स संघाचे प्रतिनिधीत्वही केले आहे.
www.konkantoday.com