*मोदी सरकारने युवकांसाठी आणलेल्या योजनांची थेट महिती देण्यासाठी “रत्नागिरी औद्योगिक महोत्सव”* *केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या हस्ते सोमवारी होणार उद्घाटन* *उद्यम रजिस्ट्रेशन नोंदणी, आधार नोंदणी, पीएम विश्वकर्मा नोंदणी होणार**

*रत्नागिरी | प्रतिनिधी*मोदी सरकारने युवकांसाठी आणलेल्या योजनांची थेट महिती देत नव उद्योजक घडवण्यासाठी आणि उद्योग करणाऱ्यांना बळ देण्यासाठी भारत सरकारचे सुक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालय थेट तुमच्या दारी आले असून रत्नागिरीत 19 व 20 फेब्रुवारीरोजी होणाऱ्या औद्योगिक महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. देशाचे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने 19 ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रत्नागिरी येथे जलतरण तलाव, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे 2 दिवसीय “रत्नागिरी औद्योगिक महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नवउद्योजकांसह पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ स्थानिकांना मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे साहेब यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे प्रमुख अधिकाऱ्यांसह जिलाधिकारी एम. देवेंदर सिंग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंतयांच्यासह अन्य भाजपा नेते पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला एमएसएमई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यमान आणि नव उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करून रत्नागिरी जिल्ह्यातील लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करण्याच्या मुख्य उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजनांबद्दल तसेच त्यांना सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेची जनजागृती करून देणे आणि योजनेचा लाभ घेणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनादरम्यान सुमारे ६० स्टॉल्सचे प्रदर्शनही आयोजित केले जाईल. यात विशेषत्वाने उद्यम रजिस्ट्रेशन नोंदणी, आधार नोंदणी, पीएम विश्वकर्मा नोंदणी केली जाणार आहे. तर प्रदर्शनामध्ये रत्नागिरीतील उद्योजक आपली उत्पादने प्रदर्शित करतील. कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी देखील केली जाईल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमादरम्यान स्वयंरोजगार आणि उद्योजकता या विषयावर कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत. संचालक, MSME-DFO यांनी सर्व विद्यमान आणि संभाव्य उद्योजकांना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.त्याचप्रमाणे, 20 फेब्रुवारी रोजी MSME द्वारे विक्रेता विकास कार्यक्रम देखील आयोजित केला जाईल ज्यामध्ये HPCL, VPCL, IOCL, कोकण रेल्वे आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सहभागी होतील. तांत्रिक सत्रादरम्यान, प्रत्येक PSU मधील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संस्थेची विक्रेता नोंदणी प्रक्रिया समजावून सांगतील आणि तांत्रिक सत्रादरम्यान त्यांच्या आवश्यकता देखील स्पष्ट करतील. उदयम नोंदणी आणि शासन कार्यक्रमादरम्यान उद्योजकांची ई-मार्केट प्लेस नोंदणी देखील केली जाईल.KVIC, NSIC, DIC आणि बँकांचे अधिकारी MSEs च्या फायद्यासाठी त्यांच्या संबंधित योजनांबद्दल सादरीकरणे देखील देतील. एमएसएमई-डीएफओचे अधिकारीही मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती देतील. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यमान आणि नवउद्योजक आणि तरुणांना निश्चितच मदत होईल, त्यामुळे या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एमएसएमई-डीएफओ, नागपूरचे संचालक पी.एम.पार्लेवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button